नांदेडमधील मठाधिपतींच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

Update: 2020-05-25 02:00 GMT

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा बु. इथल्या निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकाला तेलंगणामधून ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीमध्ये त्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मठाधीपतींची हत्या केल्यानंतर या आरोपीने तिथून त्यांची कार घेऊन पळ काढला होता. पण मठातील इतरांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्याने कार सोडून तिथून पलायन केले होते. अटक केलेल्या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून 10 वर्षांपूर्वीच्या एका खून प्रकरणात तो आरोपी आहे. तसंच नुकताच त्याच्यावर विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनीची ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली गेल्याचं दिसतंय.

कारण मृत साधूंच्या अंगावर मिरची पावडर पसरली होती आणि आरोपीने त्यांचे लॅपटॉप, पैसे आणि इतर वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच यामागे इतर कोणतेही करण दिसत नाहीये, अशी माहिती नांदेडचे एसपी विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

Similar News