'उडता महाराष्ट्र' नाही तर ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र हवा - सुषमा अंधारे

Update: 2023-10-19 14:30 GMT

राज्यात ड्रग्ज रॅकेट चालवण्याचा आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक केली. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटीलच्या अटकेवर बोलताना आता बोलणाऱ्याची तोंडं बंद होतील, असं वक्तव्य केलं होतं. यावर आता शिवसेना (उबाठा गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील. हा इशारा आहे की धमकी आहे. तोंडं बंद कराल म्हणजे काय कराल. संपवून टाकाल का? की मलिक, देशमुख आणि राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल. असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे 'उडता महाराष्ट्र' नाही तर ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र हवा आहे कसा ड्रग मुक्त महाराष्ट्र होईल आपण ड्रगविरोधात बोलणाऱ्यांना इशारा देता आहात का? असा देखीलं अंधारे यांनी उपस्थित केला आहे


Full View



Tags:    

Similar News