‘तो मी नव्हेच’

Update: 2019-11-19 05:47 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात ही भेट होती. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. त्यातच शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवूनही सत्ता स्थापन केलेली नाही. शिवसेनेने युतीमध्ये सत्तेचे समसमान वाटप हे सूत्र समोर ठेवलं होतं. या सुत्रानुसार मुख्यमंत्री पद देखील समान तत्त्वावर असावं. असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळं शिवसेनेनं भाजपशी राजकीय फारकत घेतली आहे.

आता शिवसेना, कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. सत्ता स्थापन करण्या संदर्भात शिवसेना आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीने ने कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे.

त्यामुळं आज शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत सत्तास्थापनेबाबत काहीच चर्चा झाली नाही असं शरद पवार यांनी सांगतिलं. मात्र, महाराष्ट्रात घडणाऱ्या आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडींच्या संदर्भात शरद पवार यांची भूमिका केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटी संदर्भात चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

वाचा काय म्हणाले शरद पवार

सरकारस्थापनेबाबत सोनिया गांधींशी चर्चा नाही

आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही

सोनिया गांधी आणि ए के अँटोनी यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली

आघाडीच्या मित्रपक्षांना विचारात घ्यावं लागेल

बैठकीत कोणत्याही पक्षासोबत सरकार बनविण्यावरुन चर्चा झाली नाही. जे संख्याबळ आहे त्याबाबत चर्चा झाली. आमच्यासोबत समाजवादी पार्टी, स्वाभिमान शेतकरी संघटना, कवाडे गट अशा अनेक संघटना आघाडीत होत्या. आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही. जे लोकं आमच्यासोबत निवडणुकीत होते त्यांना विचारात घ्यावं लागणार आहे असंही शरद पवारांनी सांगितले.

किमान समान कार्यक्रमावर अद्याप चर्चाच नाही, शिवाय शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही सोनिया गांधींसोबत चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

सभागृहाची प्रतिमा जपायला हवी

राज्यसभेच्या महत्वाची बाब म्हणून संसदेत चर्चा झाली. सभागृहाची प्रतिमा जपण्यावर भाष्य झालं. त्यात पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं. मी इतकी वर्ष विधानसभा, राज्यसभा, लोकसभा पाहिली. पण विरोध करण्यासाठी मी कधी वेलमध्ये आलो नाही. सभागृहाची प्रतिमा जपायला हवी असं मत पवारांनी मांडलं.

Similar News