मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेशाचा हक्क- मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

Update: 2020-01-29 15:35 GMT

मुस्लिम महिलांना मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी आहे, त्यांना रोखणाऱ्या सर्व फतव्यांकडे महिलांनी दुर्लक्ष करावे असं प्रतिज्ञापत्र ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेश देण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात २ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मुस्लिम धर्मग्रंथांमध्ये कुठेही महिलांनी मशिदीत प्रवेश करु नये असे लिहिलेले नाही, त्यामुळे महिलांना मशिदीत प्रवेशाचा हक्क मिळावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

Similar News