मेहकर विधानसभेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात, डॉ. रायमूलकर गंभीर जखमी

Update: 2020-01-10 18:36 GMT

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात रायमुलकर गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताचे फोटो पाहता त्यांना व चालकाला मोठी इजा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार रायमुलकर यांचेसह त्यांचे अंगरक्षक व वाहन चालक हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. आमदार रायमूलकर व यांच्यासह अंगरक्षक व वाहन चालकावर मेहकर येथे प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना औरंगाबाद येथील महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ रेफर करण्यात आले आहे, तर तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येतंय.

हे ही वाचा

इराण- अमेरिका संघर्ष, कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?

रवीश कुमार यांचा ब्लॉग : आपल्याच देशातील आठ राज्यांमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना जाता येत नाही

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र सर्वांधिक पुढे ! 2018 मध्ये नोंदवले गेले सर्वाधिक गुन्हे…

समोरून येणाऱ्या 407 गाडीने धडक दिल्याने दोनही वाहन पलटी झाले. यामध्ये आमदार रायमुलकर हे आपल्या इको स्पोर्ट या गाडीने खामगाव वरून कार्यक्रम संपवून मेहकर येथे परत होते.

[gallery data-size="medium" columns="1" td_select_gallery_slide="slide" ids="70707,70705,70706,70704"]

मेहकर कडून येणाऱ्या 407 या वाहनाची नायगाव दत्तपुर नजीक समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर गाडी रस्त्याच्या कडेला गेल्याचं छायाचित्रात दिसून येत आहे.

Similar News