देशाचे नवे लष्कर प्रमुख पुण्याचे सुपुत्र मनोज नरवणे

Update: 2019-12-17 05:56 GMT

देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून पुण्याचे सुपूत्र लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ही पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. नरवणे यांची काही महिन्यांपूर्वीच लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मुकुंद नरवणे देशाचे नवे लष्कर प्रमुख असतील असे म्हटले जात होतं. नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. रावत हे ३१ डिसेंबरला निवृत्त होत आहेत. आपल्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये उत्तम काम केलं आहे. यामुळेच देशाच्या नव्या लष्कर प्रमुख पदी मनोज नरवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे व पुण्यातील ज्ञान प्रबोधनीचे ते माजी विद्यार्धी आहेत.

Similar News