खासगी उद्योगांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Update: 2020-06-24 03:18 GMT

कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत. राज्यात गुंतवणूकदारांसाठी योग्य त्या धोरणांचा अवलंब केला जात आहे. अनेक अनावश्यक परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती वाढावी यासाठी आणखी काही परवानग्यांची संख्या कमी करुन ही प्रक्रिया अधिक सोपी करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींची एक समिती तयार करून राज्यातील उद्योगवाढीसाठी आवश्यक अशा सूचना या समितीच्या माध्यमातून मागवण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सांगितले. राज्यातील खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली.

राज्यातील गुंतवणूक सल्लागारांनी सर्व गुंतवणूकदारांना राज्यातच गुंतवणूक करण्याचा सल्ला द्यावा. राज्यातील त्यांची गुंतवणूक ही सुरक्षित राहील हा विश्वास त्यांनी निश्चित ठेवावा. राज्यात ग्रीन इंडस्ट्रीला चालना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या उद्योगांना खूप परवानग्यांची गरज नाही आणि ज्यांची लगेच सुरुवात करता येईल, अशा उद्योगांना ग्रीन उद्योग झोनमधून तात्काळ कार्यरत करण्याची प्रक्रिया सुरु करता येईल. यासाठी सिंगल विंडो सिस्टीम त्यांना मदतीची ठरु शकेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा..

सदोष बियाणे बनविणाऱ्या कंपनींवर कडक कारवाई करा: नाना पटोले

कापसाच्या शेतीचे अर्थकारण, शेतकरी व आपले लोकप्रतिनिधी!

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ… जबाबदार कोण?

राज्याने उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केलेला आहे. परवानग्यांची संख्या 76 वरुन 25 वर आणली आहे. भविष्यातही राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी आलेल्या तज्ज्ञांच्या सर्व सूचनांचे स्वागत केले जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

Similar News