येवला विधानसभा मतदारसंघाची लढत

Update: 2019-10-19 09:02 GMT

महाराष्ट्र विधानसभेच्या रणांगणात येवला मतदार संघ लक्षवेधी ठरणार आहे. या मतदार संघातून सलग तीनवेळा छगन भुजबळ निवडून आले आहेत. परंतु त्यांच्यात पक्षातील माणिकराव शिंदे यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला होता. त्यामुळे भुजबळ यांच्यापुढे पक्षातूनच आव्हान उभं राहिल होत. २००४, मध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहाने त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.

आघाडीच्या काळात त्यांनी त्यांनी उपमुख्यमंत्री पद देखील भुषवले. तेव्हापासून येवला मतदार संघात सातत्याने विकास काम होत गेली. त्यानंतर ते सलग तीन वेळा या मतदारसंघातुन निवडून आले. या मतदार संघात ८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. परंतु भुजबळांची थेट लढत ही थेट शिवसेनेचे संभाजीराजे साहेबराव पवार यांच्यासोबत आहे. या मतदार संघात ८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. २०१४ मध्ये भुजबळांनी सेनेचे संभाजी पवार यांचा पराभव करून लागोपाठ तीन वेळेस निवडून आले.

Similar News