कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची लढत

Update: 2019-10-19 09:45 GMT

कोरेगाव विधानसभा मतदारसंघ यंदा लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादीकडुन शशिकांत शिंदे यांनी 2009 साली प्रथमता कोरेगाव मतदारसंघातुन निवडणुक लढवली. शशिकांत शिंदे २००९ आणि २०१४ अशा दोन वेळा लागोपाठ या मतदार संघातून निवडून आले. २०१४ साली त्यांनी काँग्रेसचे विजय कणसे यांचा पराभव केला होता.

परंतु या वर्षी त्यांना या मतदार संघातून शशिकांत शिंदे यांना सरळ टक्कर देणार आहेत शिवसेनेचे महेश शिंदे मागील काही दिवसपासून शशिकांत शिंदे विरोधात त्यांच्याच पक्षातला एक गट पुढे येतोय. त्याचप्रमाणं स्थानिक उमेदवार हवा यासाठी मागणी या मतदार संघात चालूय त्यामुळे शशिकांत शिंदे यांना हि निवडणूक सोपी जाणार नाहीय. उदयनराजे भोसले यांना मानणारा एक गट या मतदारसंघात आहे त्यामुळे महेश शिंदे यांच्या प्रचारासाठी उदयन रांजेचा उपयोग सेना-भाजप कस करतात ते बघणं गरजेचं ठरेल.

Similar News