गोरेगाव विधानसभा मतदारसंघ लढत

Update: 2019-10-20 13:24 GMT

१९६२ पासून आत्तापर्यंत गोरेगाव या मतदारसंघात फक्त १९८० च्या निवडणुकांमध्येच काँग्रेसचे उमेदवार सी. एम. शर्मा निवडून आले आहेत. इतर वेळी इथल्या मतदारांनी उजव्या विचारसरणीच्या भाजप आणि शिवसेनेलाच पसंती दिली आहे. २००४ आणि २००९ मध्ये शिवसेनेचे सुभाष देसाई इथे निवडून आले आहेत. लोकसभा मतदानाच्या विरोधात जाऊन या मतदारसंघाने काँग्रेसला नाकारून भाजप-शिवसेनेला साथ दिली.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा

२०१४मध्ये भाजपच्या तिकिटावर विद्या ठाकूर इथून निवडून आल्या आहेत. या मतदारसंघात एकूण ३३५ मतदान केंद्र आहेत. विशेषत: मराठी भाषिक असणाऱ्या या मतदारसंघात भाजपने आपला चांगलाच जम बसवला आहे. २०१४ मध्ये सुभाष देसाई यांचा ५ हजार मतांनी पराभव करणाऱ्या विद्या ठाकूर यांना विद्यमान सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पंरतु यावर्षी विद्या ठाकुर यांच्या विरोधात युवराज मोहीते हे उभे आहेत. १९९३ मध्ये मुंबई बॉम्ब हल्ल्या प्रकरणी युवराज मोहीते यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. गोरेगाव मतदारसंघात समस्याचं गणित मात्र अजुन सुटलेलं नाही म्हणुन विद्या ठाकुर यांना ही निवडणुक कठीण जाणार आहे.

Similar News