धारावी विधानसभा मतदारसंघ लढत

Update: 2019-10-20 12:55 GMT

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता होती धारावी विधानसभा मतदारसंघ हा 178 क्रमांकांचा मतदारसंघ आहे. मुंबईतल्या विधानसभा मतदार संघांपैकी सर्वात वेगळा मतदारसंघ म्हणून धारावी मतदारसंघाकडं बघितलं जातं. आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून या परिसराची ओळख. या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, मोठ्या प्रमाणात नागरिक इथं राहतात. याशिवाय शेकडो छोटे मोठे लघु उद्योगही परिसरात केले जातात. अनेक जाती धर्माच्या लोकांचं वास्तव्य इथं आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. इथे 33 टक्के मुस्लिम, 25 टक्के मराठी, 25 टक्के दक्षिण भारतीय तर 5 टक्के गुजराती समाजाचे मतदार आहेत.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा

2004 पासून ते 2014 पर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड धारावीतून सातत्यानं विजयी झाल्या. 2014 च्या निवडणुकीत मुख्य चारही पक्ष वेगवेगळे लढले. त्यामुळं प्रत्येक पक्षाची ताकत या मदारसंघात दिसून आली. 2014 मध्ये मोदी लाट असूनही वर्षा गायकवाड या मोठ्या मताधिक्यानं जिंकून आल्या होत्या.

धारावी हा कामगारांचा परिसर असल्याने अनेक छोटे-मोठे उद्योग येथे अनेक वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे येथील गटारांतून कापडगिरणीतील कपडा, फोमचा कपडा, प्लास्टिक इतर उद्योगधंद्यातील सांडपाणी वाहून जात असते. गटारे तुडुंब भरलेली असतात. तरीही गटारसफाईचे काम होत नाही. पावसाळ्यात हे पाणी रस्त्यांवर येते. परिणामी, अस्वच्छता वाढत चालल्याने रोगांचा प्रादुर्भावही वाढतो आहे. धारावीत खानावळी, हॉटेल्सही मोठ्या संख्येने आहेत. या दोहोंतील कचरा अनेकदा खुलेआम रस्त्यांवर टाकला जातो. याबाबत कुठल्याही यंत्रणेचा धाक या खानावळी, हॉटेलांवर राहिलेला नाही. असे अनेक मुद्दे या मतदारसंघात प्रंलबित आहेत. पंरतु यावर्षाची वर्षा गायकवाड यांची सरळ टक्कर शिवसेनेचे आशिष मोरे यांच्याशी असणार आहे.

Similar News