अमेरिकेत उपाध्यक्षपदाच्या स्पर्धेत भारतीय वंशाच्या 'कमला'

Update: 2020-08-12 02:37 GMT

अमेरिकेत आता राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंगू लागली आहे. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे जो बिडेन यांना ट्रम्प यांच्याविरोधात अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर जो बिडेन यांनी आता भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पसंती दिली आहे. कमला हॅरीस (Kamala Harris) या मूळ भारतीय वंशाच्या आहेत. त्यांची आई भारतीय तर वडील कृष्णवर्णीय आहेत.

कमला हॅरीस यांनी आतापर्यंत एक उत्तम सिनेटर म्हणून आपली आपली ओळख निर्माण केली. उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 4 महिलांना ही संधी मिळाली आहे. 55 वर्षांच्या कमला हॅरीस या पेशाने वकील आहेत.

हे ही वाचा...

नगर जिल्ह्यातील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राचे सरकार पाडून दाखवा – सामना

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरेंचा उल्लेख

उपाध्यक्षपदासाठी महिलेची निवड केली जाईल असं जो बिडेन यांनी जाहीर केले होते. दरम्यान जो बिडेन यांनी अमेरिकेतील प्राथमिक सर्वेक्षणात रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या जॉर्ज फ्लॉईड प्रकरणानंतर #blacklivesmatter ही चळवळ उभी राहिली आहे. तसंच या प्रकरणामुळे संपूर्ण अमेरिकेत लोकांच्या मनात संताप आहे. यासर्व पार्श्वभूमीवरही कमला हॅरीस यांची निवड महत्त्वाची मानली जाते आहे

Similar News