विद्यार्थी आंदोलनातून सत्तापालट होतो, याचा मोदींना पडला विसर !!!

Update: 2019-11-22 10:51 GMT

गुजरात (Gujarat) राज्याच्या निर्मितीनंतर तिथे आलेल्या सर्व सरकार ने अत्यंत वाईट कारभार केला. सगळीकडे अनागोंदी माजलेली होती. महागाईने उग्ररूप धारण केलेलं होतं. लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मोरबी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं. त्यांना मिळत असलेल्या भोजनाच्या दरात वाढ झाल्याचे विरोधात हे आंदोलन होतं.

या आंदोलनाने नंतर व्यापक स्वरूप घेतलं आणि ते संपूर्ण राज्यभर पसरलं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे स्वरूप घेतलं. नरेंद्र मोदी (narendra modi) हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी म्हणून त्या आंदोलनामध्ये सामील होते. त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवलेली होती, ती त्यांनी व्यवस्थित निभावली होती. याच आंदोलनात जयप्रकाश नारायण यांचा सहवास नरेंद्र मोदींना लाभला.

हे ही वाचा...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?

“जेएनयू” च्या निमित्ताने….

बिनसरकारच्या राज्यातल्या नागरिकांना काय वाटतंय.

आंदोलना दरम्यान नेते मंडळींच्या चर्चा, त्यांची भाषणं यांचा जबरदस्त प्रभाव नरेंद्र मोदींवर झाला. त्याची परिणती म्हणून पुढे लोक संघर्ष समितीचा महासचिव म्हणून काम करण्याची संधी नरेंद्र मोदी यांना मिळाली. या विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांचे प्रश्न नरेंद्र मोदींना खूप जवळून समजून घेता आले. त्यांचा अभ्यास करता आला. त्याचाच परिपाक म्हणून 2001 नंतर सत्तेची संधी मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय नरेंद्र मोदी यांनी केली घेतले. त्याचा खूप चांगला परिणाम गुजरातमधील शैक्षणिक वातावरणावर झाला.

या विद्यार्थी आंदोलनाने जे व्यापक रूप घेतलं, त्यामुळे गुजरातमधील तत्कालीन सरकार कोसळलं होतं. ही सगळी माहिती नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटवर आलेली आहे.

नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात त्या विद्यार्थी आंदोलनात होते का? त्यांना जयप्रकाश नारायण यांचा सहवास लाभला होता का? हे वादाचे मुद्दे होऊ शकतात, परंतु वेबसाईटवरील ही माहिती स्पष्टपणे दर्शवते की, विद्यार्थी आंदोलनांनी व्यापक स्वरूप घेतलं की सरकारं कोसळतात, याची जाणीव आणि अनुभव नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे.

Similar News