अखेर जगानेही केले मान्य, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

Update: 2019-05-01 16:16 GMT

भारतातील अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला आज अखेर यश आले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने आज हा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली असून या निर्णयामुळे भारताच्या राजनैतिक रणनीतीला मोठं यश आलं आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा म्होरक्या मसूद हजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यासाठी फ्रान्सने हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला चीनने विरोध केला होता. पण त्यानंतर आता चीनने देखील नरमतं धोरण घेत आपला विरोध कमी केला आहे. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या निर्णयाला 151 देशांनी पाठिंबा दिला आहे. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड अजहर मास्टरमाईंड होता.

भारताने यापूर्वी २००९, २०१६, २०१९ मध्ये मसूद अझहरवर बंदी घालण्यात यावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. तरीही चीनने वीटो विशेषाधिकार वापरत या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, पुलवामा ह्ल्ल्यानंतर भारताच्या या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठींबा दिला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत चीनने आपली भूमिका नरमाईची घेतली आहे. आता अजहर बाबत पाकिस्तान कोणता निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागेल असून अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याने त्याची सर्व संपत्ती जप्त केली जाईल.

Similar News