ही बातमी देऊ शकते उदयनराजेंना मोठा दिलासा...

Update: 2019-09-23 12:07 GMT

राष्ट्रवादीने साताऱ्यात शरद पवारांच्या दौऱ्यात मोठं शक्तीप्रदर्शन करत उदयनराजे भोसले यांच्या विरोधात मोठं आव्हान तयार केलं आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.

महाराष्ट्रात नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. येत्या २१ ऑक्टोबरला दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यासोबत वेगवेगळ्या राज्यातल्या ६४ पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र, राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणुक घ्यावी अशी उदयनराजे यांची भाजपमध्ये प्रवेश करताना अट होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत विधानही केलं होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणुक जाहीर न होण्याबाबत आता तर्कवितर्कांना उधाण आलं असताना साताऱ्याची लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेच्या निवडणुकीसोबत होणार असल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात सकाळने वृत्त दिलं आहे.

Similar News