माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

Update: 2020-08-11 02:00 GMT

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्वत: प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरदावरे सोमवारी कळवले होते. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी विलगीकरणात राहून चाचणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

आर्मी हॉस्पिटलमध्ये सोमवारी त्यांच्यावर मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या मेंदूत गाठ असल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पण त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हे ही वाचा...

अत्यावश्यक सेवा वगळता सामान्यांसाठी तूर्तास लोकलची दारं बंदच

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये असा साजरा होणार स्वातंत्र्य दिन

मराठा आरक्षणाविरोधात भाजपचे राजकीय षडयंत्र : अशोक चव्हाण

दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा यांच्याकडे तब्ब्येची विचारपूस केली आहे. तसंच प्रणव मुखर्जींना लवकर बरे वाटावे अशा शुभेच्छा दिल्याची माहिती राष्ट्रपती भवनातर्फे देण्यात आली आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आर्मी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांची भेट घेतली तसंच प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतची विचारपूस केली.

Similar News