शेवटी अवतरले बांधावर!

Update: 2019-11-03 11:16 GMT

परतीच्या पावसामुळे(rain) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वच राजकीय नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत. याची सुरुवात शरद पवारांपासुन झाली त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी पीकांची पाहणी केली. परंतू आता, प्रत्यक्षात काळजीवाहू मुख्यमंत्री (chief minister) शेतकऱ्यांच्या बांधावर अवतरले आहेत.

हे ही वाचा...

अकोला जिल्ह्यातील लाखनवाडा, चिखलगाव आणि म्हैसपूर या गावांमध्ये सुमारे सहा शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आज मुख्यमंत्र्यानी पाहणी केली.

सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग अशा सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ऑक्टोबरच्या अवकाळी पावसाने झाले आहे. पण, शेतकऱ्यांनी अजीबात चिंता करू नये. राज्य सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहील. अगोदरच राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत यापूर्वीच जाहीर केली आहे.

Similar News