अमित शहांवर निर्बंध घालण्याची मागणी

Update: 2019-12-11 04:25 GMT

नागरिकत्व दुरूस्ती विधेयक सोमवारी 311 विरूद्ध 80 मतांनी मंजूर झाले. आता हे विधेयक राज्यसभेमध्ये बुधवारी मांडण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता हे बिल मांडण्यात येणार आहे, या वरील चर्चेसाठी सहा तासांचा वेळ राखून ठेवण्यात आलेला आहे.

दरम्यान, या बिलावरील चर्चेला उपस्थित राहण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या खासदारांना व्हिप जारी केलेला आहे.

लोकसभेत बिल पास झालेलं असलं तरी राज्यसभेत हे बिल पास होणं जरूरी आहे. हे बिल पास झालं तर अमित शहा यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत अशी मागणी US Commission for International Religious Freedom (USCIRF) ने केली आहे. हे विधेयक भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या इतिहासाच्या आणि संविधानाच्या विरोधात असल्याने तसंच नागरिकत्वासाठी धार्मीक चाचणी घेण्यासारखी स्थिती असल्याची भीती या आयोगाने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा

CAB : भारताच्या ‘या’ प्रमुख नेत्यांवर अमेरिका बंदी घालणार?

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला झुकतं माप ! कोणत्या पक्षाकडं असणार कोणतं खातं?

दिड कोटी लिटरच्या शेततळ्याची कहाणी…

दरम्यान आज सोशल मिडीयावर ही या विधेयकावरून जोरदार चर्चा सुरू होत्या. #RajyaSabha #CitizenshipAmendmentBill2019 #CitizenshipBill #ConstitutionofIndia #किसीकेबापकाभारतथोड़ीहै

असे अनेक हॅशटॅग आज ट्रेंडींग होते.

दरम्यान विरोधी पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी ही या बिलाला विरोध दर्शवला आहे.

https://twitter.com/SitaramYechury/status/1204107724390166533?s=20

जिन्ना आणि सावरकरांचं स्वप्न पूर्ण करणारं हे बील आम्ही पूर्णपणे नाकारतोय. हे घटना विरोधी आहे आणि आपल्या लोकांमध्ये फूट पाडणारं आहे. आम्ही याचा सर्व पातळ्यांवर विरोध करू अशी प्रतिक्रीया सीताराम येचुरी यांनी दिली आहे.

https://twitter.com/PrashantKishor/status/1204086921703510017?s=20

जेडीयू CAB ला समर्थन करत आहे याचा धक्का बसला. हे बील धर्माच्या आधारावर नागरिकांच्या हक्कांमध्ये भेदभाव करत आहे. गांधीवादापासून प्रेरित असल्याचा दावा करणाऱ्या तसंच पक्षाच्या घटनेच्या पहिल्याच पानावर तीन वेळा सेक्युलर शब्द असणाऱ्या पक्षाने असा निर्णय घ्यावा हे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रीय प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली आहे.

Similar News