दिलासादायक : राज्यात २४ तासात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या घटली

Update: 2021-02-22 14:40 GMT

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे. पण सोमवारी कोरोनाबाधीत नवीन रुग्णांची संख्या रविवारपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. दिवसभरात ५ हजार २१० नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. रविवारी ही संख्या ६ हजार ९७१ होती. सोमवारी दिवसभरात ५ हजार ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर दिवसभरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंतत एकूण १९ लाख ९९ हजार ९८२ कोरोना बाधधत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६% एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यू दर २.४६% एवढा आहे. राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या सध्या ५३ हजार ११३ आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात दिवसभरात एकही मृत्यू नाही

दरम्यान सोमवारी मुंबईत ७६१ नवीन रुग्णांची नोंदणी झाली आहे. त्याबरोबर मुंबई महानगर प्रदेश विभागात १३६४ रुग्णांची नोंदणी झाली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे या संपूर्ण विभागात दिवसभरात एकाही रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. तर राज्यात सर्वाधिक एक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. पुण्यात सध्या ९ हजार ८७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर मुंबई, ठाणे, नागपूर आणि अमरावती य़ा जिल्ह्यांमध्येही ५ हजारांच्यावर रुग्ण एक्टिव्ह आहेत.

Similar News