काँग्रेसचं ठरलं! आज संध्याकाळी जाहीर करणार निर्णय

Update: 2019-11-11 07:38 GMT

आज सकाळी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या(congress) वर्किंग कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेला (shivsena) पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,(sonia gandhi) महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे,(Mallikarjun Kharge) अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्यात चर्चा झाली. यामध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जर शिवसेनेसोबत सत्तेत जायचं तर त्याचं स्वरूप कसं असेल किंवा या निर्णयाबाबत कोणाचं दुमत आहे का याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावलं आहे. ४ वाजता पुन्हा एकदा बैठक होणार असून राज्य आणि केंद्रातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं आहे.

Similar News