कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी वानखेडे स्टेडियमची चाचपणी

Update: 2020-05-17 03:04 GMT

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच आता पावसाळा जवळ आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, भविष्यातील नियोजनाच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिका जागांची पाहणी करत आहे. जागेची उपलब्धता असावी या अनुषंगाने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी वानखेडे स्टेडियमची पाहणी केली.

वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे सोय करता येऊ शकते, स्टेडियमच्या आत आणि बाहेर किती टॉयलेट असावे याचीही चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या "ए" विभागाच्या वतीने वानखेडेच्या प्रशासनाला एक पत्र देण्यात आले असून कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.

Similar News