फडणवीस केंद्राचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री झाले- अनंत हेगडे

Update: 2019-12-02 04:45 GMT

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठींब्यानं सरकार स्थापन केलं. मात्र, हे सरकार 80 तासात गडगडलं. यामुळे राज्यात मोठा पेच देखील निर्माण झाला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ ही केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी होती. असं खळबळजनक विधान भाजप खासदार अनंत हेगडे(Ananth kumar hedge) यांनी केलं आहे.

‘आपल्या सगळ्यांना माहिती आहे. की, महाराष्ट्रात आमचा माणूस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला आणि त्यानंतर राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक का केलं? काय आम्हाला हे माहिती नव्हतं का? आमच्या कडे बहुमत नाही. आणि तरीही मुख्यमंत्री झाले. हा तो प्रश्न आहे. इथं प्रत्येक जण विचारत आहे.’असं म्हणत हेगडे य़ांनी

‘मुख्यमंत्र्यांकडं 40 हजार कोटी केंद्राचा निधी होता. जर कॉंग्रेस, एनसीपी आणि शिवसेना सत्तेत आले असते. तर त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला असता. हेच कारण आहे की, केंद्र सरकारच्या या पैशाचा उपयोग विकासकामांसाठी होऊ नये म्हणून हे नाटक केलं’

‘यासाठी खूप अगोदर पासून योजना तयार केली गेली होती. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्याच्या 15 तासानंतर 40 हजार कोटी रुपये ज्या जागेवर पाठवले. त्या जागेवरुन ते आले होते. अशा पद्धतीने फडणवीस यांनी सर्व पैसा केंद्र सरकारला परत करत पैशाची बचत केली’.

Similar News