२ वर्षात भाजपनं गमावली ७ राज्ये

Update: 2019-12-23 15:00 GMT

झारखंडमध्ये भाजपचा पराभव (BJP lost) झालाय. झामुमो-काँग्रेस-राजद आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत येणाऱ्या भाजपच्या (BJP) हातात आता केवळ १६ राज्य उरली आहेत. या राज्यातील लोकसंख्या केवळ ४२ टक्के आहे. गेल्या दोन वर्षात भाजपने गमावलेलं हे सातवं राज्य आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये देशाच्या ७२ टक्के लोकसंख्या असलेल्या १९ राज्यात एनडीयेची सत्ता होती. सध्या केवळ १६ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे.

हे ही वाचा

भाजपा का हरतोय..

Fact Check: NRC, CAA, मोदी आणि डिटेंशन सेंटर

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचं आश्चर्य – शरद पवार

यापुर्वी मध्यप्रदेश,राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजप सरकार होतं. मात्र वर्षभरापुर्वी झालेल्या निवडणूकांमध्ये ही राज्ये काँग्रेसने (Congress) जिंकली.

मार्च २०१८ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये भाजप-टीडीपी सरकार होतं. मात्र राज्याला विशेष दर्जा देण्याच्या वादावरुन युती तुटली आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचे सरकार आलं.

महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरुन भाजप- शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेने कॉग्रेस—राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन सरकार बनवलं.

जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीसोबत भाजपची सत्ता होती. मात्र जून २०१८ मध्ये भाजपने पीडीपीसोबत युती तोडली आणि तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्त आली. या दरम्यान भाजपने कर्नाटक, मिझोरम, त्रिपुरा आणि मेघालयात सत्ता स्थापन केली.

सध्या या राज्यांमध्ये एनडीएची सरकारं

उत्तर प्रदेश

बिहार

गुजरात

कर्नाटक

गोवा

हरियाणा

उत्तराखंड

हिमाचल प्रदेश

सिक्किम

अरुणाचल प्रदेश

आसाम

नागालँड

मणिपुर

मेघालय

मिजोरम

त्रिपुरा

Similar News