"अपरिपक्व नंबर - २" भाजपचा रोख कुणाकडे?

Update: 2020-08-19 03:41 GMT

पार्थ पवार (Parth Pawar) यांनी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षविरोधी भूमिका मांडल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना जाहीरपणे फटकारलं. पण त्याचवेळी शरद पवार यांच्या आणखी एका नातवाने सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणी केलेली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.

पण त्यांच्या मागणीनंतर भाजपने राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलेला आहे. भाजपचे नेते विश्वास पाठक यांनी फेसबुक वरून रोहित पवार यांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा...

“कोर्टाच्या अवमानाची भीती दाखवून आवाज दाबता येणार नाही”

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे होणार

जैविक आपत्तीला कसं तोंड द्यावं?

राज्यात रुग्णांचे कोरोनामुक्तीचे प्रमाण ७१.१४ टक्के

 

पार्थ पवार यांनी सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर शरद पवार यांनी पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत. त्यांच्या बोलण्याकडे आपण लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. तसंच राम मंदिराच्या मुद्द्यावर देखील शरद पवारांपेक्षा वेगळी भूमिका मांडत पार्थ पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाचा समर्थन केलं होतं.

यानंतर पवार कुटुंबात मतभेद असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती, हा वाद थंड होत नाही तोच रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या भूमिकेला छेद देत राज्यातील मंदिर खुली करावी, अशी मागणी केली आहे. कारण मंदिरांवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे तसेच लोकांच्या भावनेशी संबंधित हा प्रश्न आहे असं म्हणत मंदिर खुले करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Similar News