उदयनराजे यांच्या पत्रकार परिषदेतून त्यांची लाचारी दिसून येते – नवाब मलिक

Update: 2020-01-14 12:14 GMT

छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारं पुस्तक भाजपनं प्रकाशित केल्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. छत्रपतींचे वंशज संभाजीराजे यांनी आपली नाराजी थेट जाहीर केलीये. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना केल्यानं छत्रपती संभाजीराजे, शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील आपली नाराजी तात्काळ व्यक्त भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आज उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्या टीकेला आज राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिले.

उदयनराजे भाजपात गेल्यानंतर त्यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत कुठेही निषेध केला नाही. भाजपच्या विरोधात काही बोलले नाही. याचा अर्थ इतरांकडे बोट दाखवून त्यांची लाचारी काय आहे हे दाखवून देत आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

जाणता राजा शब्द शरद पवारांनी कधी वापरला?

जाणता राजा हा शब्द शरद पवार यांनी स्वतः ला लिहिला नाही. जाणता राजाच्या अर्थ आहे की, ज्याला सर्व विषयांची जाण आहे. पक्षाने त्या शब्दाचा कधी वापर केला नाही. आदित्यनाथ आणि गोयल मोदींचे सरळ नाव घेवून सांगत आहेत. त्यावर उदयनराजे काही बोलले नाहीत. याकडेही नवाब मलिक यांनी माध्यमांचे लक्ष वेधले आहे.

उदयन राजे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने ‘महाशिवआघाडी’ हे नाव का काढले? असा सवाल केला होता. त्याला मलिक यांनी उत्तर देताना ‘आम्ही शिवआघाडी असं नाव कधी ठेवलं नाही. आमचं महाराष्ट्र विकास आघाडी असं नाव आहे’. असं स्पष्टीकरण दिलं.

Similar News