ताई,घाबरू नको!मी कुत्रा आहे...वासनाधीन पुरुष नाही.

Update: 2018-09-25 12:31 GMT

नंतर मात्र त्यांनी तसेच मला अर्धनग्न ठेवून पळ काढला होता.त्यांची ताकद प्रचंड होती,एकेकाने जरी आले असते तरी मी प्रतिकार करू शकले नसते.मात्र त्यांनी झुंडीने येण्याचे ठरवले.ती सर्व लोक माझे शरीर छिन्नविच्छिन्न करत होतात.

त्यांच्यातील मर्दांगी गळून पडताच त्यांनी तिथून पळ काढला.

माझ्यात मात्र उठून बसता येईल इतकाही त्राण नव्हता,कुणाला आवाज देता येईल इतकाही शरीरात जीव नव्हता...मी,पाणी पाणी करत तसेच बेशुद्ध पडले...

आजूबाजूला निरव शांतता होती.बेभान होऊन हरवून पडलेली मी कुणीही त्या दिशेने येणारे नव्हते कदाचित म्हणूनच सकाळच्या आग ओकायाला सुरवात केलेल्या सुर्यानेच मला कदाचित शुद्धीवर आणले असेल...

यांनी माझ्या देहावर दगड टाकला नाही,यांनी माझ्या गुप्तांगात कसलीच सळी घातली नाही..

कदाचित त्यांना वाटलं असेल पहाटेच्या झुंजूमुजुंपर्यंत ही अशीच मरून जाईल...कोण येईल इकडे हिला वाचवायला? म्हणून त्या मृत मर्दानी असे कृत्य केलं नसेल.

भूक भागवून त्यांनी काढता पाय घेतला असावा...

मात्र जेव्हा मी शुद्धीवर आले,तेव्हा आजूबाजूला पडलेला पाचोळा आणि माझ्या पायाला लागून मला एकसारखे टक लावून घाबऱ्या नजरेने बसून असलेला कुत्रा दिसला...

मी, सुटकेचा निश्वास टाकला..कारण तिथे पुरुष असता तर मी आणखी हादरले असते.तिथे पुरुष असता तर मी आणखी वासनेची भूक बनले असते..

मात्र तिथे कुत्रा होता.कुत्रा असल्यामुळे घाबरण्याचे कारण राहिले नाही...कारण त्याला वासनेची आणि पोटाची भूक यातील फरक करण्याची समज आलेली होती...

तो बोलू शकला असता तर त्याने नक्कीच मला म्हटलं असतं.ताई,घाबरू नको!मी कुत्रा आहे...वासनाधीन पुरुष नाही.

 

Similar News