जागतिक तापमान वाढीमुळे येत्या काळात समुद्रांची पातळी वाढण्याची भीती आहे. या वाढत्या पातळीचा धोका मुंबईसह देशातील १२ शहरांना आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दीड ते दोन फुटांपर्यंत समुद्राची पातळी वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. या पार्श्वभूमीवर खरंच मुंबईत पाण्याखाली जाणार का, पर्यावरणाचा ऱ्हास कसा रोखता येईल, याबद्दल पर्यावरण तज्ज्ञ प्रियदर्शिनी कर्वे यांच्याशी बातचीत केली आहे प्रियदर्शनिही हिंगे यांनी....