मुंबई पोलिसांना बदनाम करण्यामागची कारणं कोणती? धनंजय शिंदे

Update: 2020-10-09 04:19 GMT

social media

https://www.maxmaharashtra.com/max-kissan/agri-reform-bills-what-will-the-new-system-which-effectively-bypasses-apmc-mandis-analysis-by-amar-habib-614486

Full View

काय म्हणतायेत धनंजय शिंदे...  कुजबुज नीती, खोटा- विखारी प्रचार व भावनेचं राजकारण करतानाच आपले राजकीय विरोधक व प्रस्थापित लोकशाही संस्थांवर मीडिया, सोशल मीडिया, तंत्रज्ञान यांचा गैर वापर करून नामोहरम करण्याची नवीन पद्धत भाजप ने विकसित केली आहे. ही देशाला अत्यंत घातक आहे. असं मत धनंजय शिंदे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं आहे.

यासाठी भाजपाचे डिजिटल कार्यकर्ते, समर्थक, पत्रकार, विकाऊ मीडिया, फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब हे प्लॅटफॉर्म, भाजपचे प्रस्थापित नेते व IT सेल यांची राक्षसी व अमानवीय - क्रूर यंत्रणा तयार केली गेली आहे. ही राक्षसी यंत्रणा व परकीय शक्तींचा वापर करून माणसाला संमोहित करण्याची भाजपची नीती "जनताद्रोहाची" आहे.

मुंबई पोलीस, मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे, महविकास आघाडी यांच्यावर संघटितपणे "आभासी" हल्ला करण्याच्या नादात भाजपने "महाराष्ट्राच्या संस्कृती"वर देखील हल्ला केल्याचे जनतेला समजले आहे. बिहार विधानसभेसाठी केलेल्या या अत्यंत गलिच्छ व विखारी कृतीची उत्तरे येत्या काळात महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना द्यावी लागतील. मुंबई पोलिसांनी व महविकास आघाडी सरकारने फेक आयडी व सोशल मीडिया अकाऊंटस् चा शोध घेऊन ही विखारी प्रचार यंत्रणा नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे.

असं मत धनंजय शिंदे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News