खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल असे सर्वच महापुरुषांनी म्हटले आहे. पण त्यासाठी त्या गावाची आणि गावाचे नेतृत्व करणाऱ्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे, असे मत आदर्श गाव ठरलेल्या पाटोद्याचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये भास्कर पेरे पाटील यांनी प्रत्येक गाव आदर्श गाव होऊ शकते पण त्यासाठी सरपंच आणि त्या गावातील गावकऱ्यांनी काय केले पाहिजे याची रुपरेषा मांडली. एवढेच नाहीतर सरपंचांच्या कामाचे प्रशिक्षण घेतलेल्या लोकांनाच उमेदवारी दिली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासह गावांच्या विकासाचे व्हिजन काय असावे या सर्व मुद्द्यांवर भास्कर पेरे पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी....