मी व्यथीत झालो आहे: उद्धव ठाकरे

Update: 2020-05-08 14:34 GMT

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्यावर गेली आहे. मुंबईत कोरोना व्हायरस ची संख्या वाढत आहे. त्यातच आज राज्यात काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. तसंच अधिकारी ऐकत नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनीधी करत आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी असा संघर्ष निर्माण झाला आहे.

राज्यातील परप्रांतीयांचा मोठा प्रश्न आहे. ज्या लोकांचे हाताचे काम गेले. त्यांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. त्यातच विधानपरिषद निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. लोकांचा धीर सुटत चालला असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री..

मुंबईत लष्कराची गरज नाही. जे काही मी करत आहे. तुम्हाला विचारुन करत आहे. गेले काही दिवस अफवा पसरवले जात आहे. मुंबईत लष्कर येणार नाही. काळजी करु नका.

केंद्र सरकार ने आपल्याला त्यांची हॉस्पिटल, डॉक्टरर्स देण्याची तयारी दर्शवली आहेत.

डॉक्टर आणि पोलिसांना विश्रांती देणं गरजेची... त्यामुळं जर गरज पडली तर लष्कर बोलावू. पोलिसांना आराम देणं गरजेचं आहे.

परप्रांतीय लोकांना पोहोचवणं गरजेचं आहे. तसंच आपली लोक अडकली आहेत. त्यांना परत आणायचं आहे. मात्र, हे सगळं करताना मोजून मापून करत आहोत.

लॉकडाऊन हा गतिरोधक आहे. मात्र, चैन तोडण्यात आपण अयशस्वी झालेलो नाहीत. त्यामुळं आपल्याला लॉकडाऊन कडकपणे पाळावे लागणार आहेत.

टेस्ट कमी होणार नाहीत. टेस्ट सुरु राहतील. काही लोक शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये येतात.

राज्यात 18 हजार पॉझिटीव्ह...

काही कोव्हीड पॉझिटीव्ह मातांना झालेल्या बाळाला कोव्हिड ची लागण झालेली नाही. हा निसर्गाचा चमत्कार आहे.

गलथान कारभार सहन केला जाणार नाही. गलथान कारभार, दफ्तर दरंगाई ला क्षमा केली जाणार नाही.

आयुष, आयुर्वेद, होमिपॅथी डॉक्टरांनी या लढाईत सहभागी व्हावी, त्यांना मी विनंती करतो. या लढाईत सहभागी व्हावं...

लॉकडाऊन वाढवणं कोणालाही आनंद नाही... शिस्त पाळली तर लॉकडाऊन वाढवलं जाणार नाही.

मला लष्कराची गरज नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.

Full View

Similar News