टाळेबंदीचा अतिरेक नको!

Update: 2020-06-11 11:34 GMT

केंद्र सरकार ने अनलॉक 1 ( Unlock1 ) ची घोषणा केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मिशन बिगन अगेन (Mission Begin Again) ची घोषणा करत राज्यात अनेक उद्योगांना परवानगी दिली आहे. मात्र, हे उद्योग धंदे सुरु झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये गर्दी वाढत असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी

'जर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही आणि गर्दी वाढत राहिली तर पुन्हा एकदा नाईलाजाने कठोर लॉकडाऊन करावा लागू शकतो.' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे राज्यात लॉकडाऊनबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे नागरिक पुन्हा गर्दी करु लागल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्यात नाईलाजाने कठोर लॉकडाऊन करावा लागू शकतो. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असलं तरी लॉकडाऊन हाच कोरोना व्हायरस ला रोखण्याचा पर्याय आहे का?

‪मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे कितपत शक्य आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं धोरण चुकत आहे का? सरकार ने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात? पाहा मॅक्समहाराष्ट्र चे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांचे विश्लेषण

Full View

Similar News