पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनच पक्ष कार्यालयात तोडफोड

Update: 2019-12-31 14:53 GMT

आपल्या नेत्याला काँग्रेसनं मंत्रिपद न दिल्यानं नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना पुण्यात काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड केलीये. भोर मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. पण त्यांना पक्षानं संधी न दिल्यानं नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी आज थेट पुणे शहर काँग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड केली.

थोपटे घराणे हे काँग्रेसशी कायम प्रामाणिक राहिले असूनही त्यांना मंत्रिपद दिलं नाही या नाराजीतून ही तोडफोड केल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय. संग्राम थोपटे हे भोर मतदारसंघाचे आमदार आहेत. या तोडफोडीमध्ये काँग्रेस कार्यालयाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Full View

 

Similar News