बिनखात्याच्या मुख्यमंत्र्यांचं अस्तित्व काय?

Update: 2019-12-13 16:54 GMT

राज्यात सरकार स्थापन झालं तरीही मंत्रीमंडळ विस्तारासाठी काही मुहुर्त मिळत नव्हता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार सांभाळताच काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. खातेवाटप कधी होणार आणि कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणतं खातं येणार हा पेच महाविकासआघाडी समोर उभा होता तो पेच आचा सुटला आहे.

१६ तारखेपासुन नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या निमित्ताने खातेवाटपाचा कार्यक्रमही पार पडला. मात्र, या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे कोणतही खातं ठेवलं नाही ही विशेष बाब आहे. हे खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपाचं असल्याचं काही नेत्यांकडून म्हटलं जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडे कुठलंही खातं असलेलं दिसलं नाही. मग त्यांच्या पदाचं सरकारात अस्तित्व काय उरतं? याचा सरकारच्या कारभारावर काय परिणाम होतो? याआधी महाराष्ट्रात असं झालंय का? देशात कोण कोण बिनखात्याचे मुख्यमंत्री राहीले आहेत? सांगताहेत, राजकीय अभ्यासक राज असरोंडकर...

https://youtu.be/sVs314Slf40

 

Similar News