आता राज्यपालांची भूमिका बदलली का?

Update: 2022-06-30 16:43 GMT

सतत वादात सापडणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहे. आज राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंना स्मरून घेतली राज्यपालांनी त्यांना अडवले नाही. २०१९ मधे महाविकास आघाडी सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यात शपथेआधी नेत्यांची आणि देवतांची नावे घेतली होती म्हणून मंत्र्यांना पुन्हा शपथ घ्यावी लावली होती. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेचा दावा करायला गेल्यावर राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीस यांना पेढेही भरवले होते. त्याशिवाय शपथविधी वेळी जोरदार घोषणाबाजी होत असतानाही राज्यपालांनी आक्षेप घेतला नाही याबद्दल समाज माध्यमातून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

Full View
Tags:    

Similar News