सत्तासंघर्ष LIVE : फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु, उद्या संध्याकाळी 5 वा. अग्निपरीक्षा

Update: 2019-11-26 05:24 GMT

महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. 27 नोव्हेंबरला फडणवीस सरकारला विश्वासमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. या अगोदर आमदारांचा शपथविधी पार पाडला जाणार आहे. घोडा बाजार रोखण्यासाठी आम्ही हा निर्णय़ घेत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री (CM) पदाची शपथ घेतली तर दुसरीकडे अजित पवार (ajit pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.

गेल्या एक महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना अधिकच वेग आला. सर्व पक्षांनी आपले आमदार फुटू नयेत म्हणून हॉटेलमध्ये बंदीस्त केले. तर दुसरीकडे सत्तास्थापनेसाठी राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेने (Shiv sena) सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्याची सुनवाई रविवार सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती.

त्यानंतर काल सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली होती.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना राज्यपालांना देण्यात आलेल्या प्रस्तावातील आवश्यक ती कागदपत्रं कोर्टापुढे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसंच उद्या सकाळी म्हणजे आज 10.30 पर्यंत ही कागद पत्र सादर करावी," असं म्हटलं होतं. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात या सुनवाईला सुरुवात झाली आहे...

कॉंग्रेसच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात कपील सिब्बल आणि मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. तर सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं बाजू मांडताना तुषार मेहता यांनी निवडणुकीपुर्वी युतीची कल्पना राज्यपालांना होती. असं सांगत निकालानंतर कोणत्याही पक्षांने सत्ता स्थापन न केल्यानं राज्यात 9 नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली.

हे ही वाचा...

संविधान दिवस : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांऐवजी घटना दुसऱ्या कोणी लिहिली असती तर…

‘सत्तातूरांना न भय, न लज्जा’ – एकनाथ खडसे

‘हे गोवा नाही महाराष्ट्र आहे, इथं काहीही खपवून घेतलं जाणार नाही’ – शरद पवारांची गर्भीत धमकी

तसंच तीन पक्षांनाही सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं होतं. याबाबत मेहता यांनी न्यायालयाला अवगत केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांना सादर केलेली पत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. अजित पवार यांनी ५४ आमदारांचं तर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच पत्र धरुन माझ्यासोबत १७० आमदारांचा पाठिंबा असून, अपक्षही आमदार सोबत आहेत, असं या पत्रात म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, ज्या आमदारांनी अजित पवार यांना पाठींबा देण्याऱ्या राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांनी पाठींबा का काढला का? असा सवाल न्यायमूर्ती खन्ना यांनी केला. त्यांची स्थिती काय आहे? त्यांनी पाठिंबा मागे घेतला आहे का?, असा प्रश्न विचारला. यावर रोहतगी यांचं उत्तर "सध्या आम्हाला निश्चित सांगता येणार नाही. त्यांच्यात अंतर्गत वाद आहेत. मात्र, बहुमत चाचणीत हे दिसेल.

तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वकिलांनी बाजू मांडताना अभिषेक मनू सिंघवी यांनी आम्ही सभागृहात पराभूत व्हायला तयार आहोत. पण, तरीही ते (भाजपा) बहुमत चाचणी घ्यायला तयार नाही, असं आजच सुनवाई घ्या अशी विनंती न्यायालयाला केली. तसंच या दोनही बाजूंच्या आमदारांची समर्थनाची पत्र न्यायालयात सादर करण्यात आली.

दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने काल निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज न्यायालयाने निकाल दिला.

Full View

Similar News