पिकांची पहाणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल- पालकमंत्री विष्णू सवरा

Update: 2018-10-21 08:48 GMT

अनियमित पावसामुळे पालघर जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी मोखाडा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांमधील परिस्थितीची प्रत्यक्ष शेतीवर जाऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील पीक परिस्थितीबाबत माहिती देऊन ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

शासनाने सॅटेलाईटद्वारे सर्व्ह केला असला तरी प्रत्यक्ष जिल्हयातील आठही तालुक्याची पहाणी केली जाणार आहे. यानंतर पिकाची वस्तू स्थिती मुख्यमंत्र्यांना कळवली जाईल नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊन देणार नाही, असे सवरा यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ, किनिस्ते ,कोशिमशेत ,धामणशेत, शेंड्याचीमेट, टाकपाडा, आदी गावांना भेट दिली. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सप्टेंबर महिन्यातील कडक ऊन्हामुळे जिल्हयातील तालुक्यांमध्ये बहुतांश पिक करपुन गेले, भात, नागली आणि वरई या पिकांवर करपा, तांब्या आणि बगळ्या रोगांचा प्रार्दुभाव झाला. वाढत्या तापमानात भातावरील विविध रोगाचा प्रसार वाढला व येणं भात पीक तयार होण्यासाची प्रक्रिया सुरू असताना दीड ते दोन महिने पावसाने हुलकावणी दिल्याने आवश्यक पाणी शेतीला मिळाला नसल्याने भाताच्या उत्पादनात मोठी घट होणार असून शेतकऱ्यांच्या हाती 50 टक्क्यांपेक्षाही कमी पिक लागणार आहे.

अनेक भागात पिक करपल्याने पिकाऐवजी गवताची पेंढी हाती येण्याची स्थिती असून वाडा सारख्या भातशेतीला पूरक आणि वाडा कोलम सारख्या भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातील शेतकरी पावसाने पाठ फिरविल्याने करपलेल्या शेतीला आगी लावून संताप व्यक्त करीत असून करपलेले भात पाण्या अभावी जमिनीला पडलेल्या भेगा येथील दुष्काळच भयाण वास्तव दर्शवित आहे.

Similar News