मुंबईत भेसळयुक्त दुधाची होणारी विक्री रोखण्यात यश

Update: 2018-10-17 10:20 GMT

सणासुदीच्या दिवसांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधाची होणारी विक्री रोखण्यासाठी एफडीएने अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवारी रात्री मुंबईच्या पाचही एंट्रीपॉईंटवर नाकाबंदी करून दुधाच्या टँकरची तपासणी केली असून ह्यामध्ये एफडीएच्या कारवाईत 19 हजार 250 लीटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात यश आले. मुंबईत प्रवेश करण्यासाठी मानखुर्द, वाशी, ऐरोली, आनंद नगर, दहिसर आणि मुलुंड याठिकाणी हे पाच टोल नाके असून या कारवाईत 227 टँकरची तपासणी केली आहे एकूण 5 टँरचे नमूने हे शरीराला अपायकारक आहेत असे दिसून आले पुनर्प्रक्रियेसाठी पुणे आणि नाशिकला परत पाठव्यात आले आहेत.

Similar News