…म्हणून शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांच्या घरी पाठवल्या बांगड्या

Update: 2018-12-22 12:24 GMT

पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्याला भाव मिळत नसल्यानं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या घरी बांगड्या पाठवल्या आहेत. सध्या कांद्याचे भाव कोसळले असून कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विशेष बाब म्हणजे सध्या कांदा उत्त्पन्नासाठी हजारो रुपये शेतकऱ्याला अगोदर खर्च करावे लागतात. मात्र, कांदा विक्रीला गेल्यास शेतकऱ्याच्या हातात कवडी देखील पडत नाही.

आपल्या कांद्याला भाव न मिळाल्यानं शिरुर तालुक्यातील टाकळीहाजी येथील संजय बाराहाते या शेतकऱ्याने ४९७ किलो कांदा विक्रीसाठी आणल्यानंतर त्याच्या हातात अवघे ४ रुपये आले. म्हणून संत्पत झालेल्या शेतकऱ्याने केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांना कांदा उत्पादनातून आलेली रक्कम मनीऑर्डर केली आहे. तर कृषी मंत्र्यांच्या पत्नीला आहेर म्हणुन बांगड्या पाठविण्यात आल्या असून यातुन कृषी मंत्र्यांना जरी शेतकऱ्यांच्या समस्या समजत नसतील तर एक स्त्री म्हणून कृषी मंत्र्यांच्या बायकोला शेतकऱ्यांच्या समस्या समजतील म्हणून बांगड्या पाठवण्यात आल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

Full View

Similar News