...पुन्हा शेतकरी वादळ मुंबईत धडकलं

Update: 2019-01-20 07:48 GMT

गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय शेतकरी बांधवांना आपल्या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चे, आंदोलनं, उपोषण उभारावी लागत आहेत. आता यात आणखी एक भर म्हणून साताऱ्यातील शेतकऱ्यांनी अनोखा मोर्चा काढत मुंबईत धडक दिली आहे. साताऱ्याहून निघालेल्या शेतकऱ्यांनी भर थंडीत हा मोर्चा अर्धनग्न अवस्थेत काढला आहे. सरकारला आपल्या मागण्या कळावेत म्हणून त्यांनी या पद्धतीने मोर्चा मुंबईच्या दिशेने वळवला आहे. मात्र 150 शेतकऱ्यांना मुंबई पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच म्हणजे मानखुर्द येथे अडवले आहे.

शेतकऱ्यांचा मागण्या नेमक्या काय आहेत?

या शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या बदल्यात योग्य मोबदला, तसेच स्थानिकांना काम, यासाठी हा मोर्चा आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचे राहिल. या मोर्चेकरी शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी शिरिष गवळी यांनी पाहा हा व्हिडिओ... https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/395520711016239/

Similar News