नवोदय अर्बन कॉ. ऑप बॅँकेवर रिजर्व्ह बॅंकचे निर्बंध

Update: 2018-01-24 14:11 GMT

भारतीय रिजर्व्ह बॅंकेने नवोदय अर्बन सहकारी बॅंक लिमिटेड, नागपूरवर घातलेले निर्बंध ६ महिन्यांनी वाढवले आहेत. आता या निर्बंंधाची मुदत १५ जुलै २०१७ पर्यंत राहिल असं रिजर्व्ह बॅंकेने काढलेल्या निर्देशात म्हटले आहे. हे निर्देश बैंककारी विनियमन अधिनियम, १९४९ च्या कलम ३५ ए (१) नुसार निर्गमीत करण्यात आले आहेत.

भारतीय रिजर्व बॅकेने आज नवोदय अर्बन सहकारी बॅंक लिमिटेड, नागपूरवर लावलेल्या निर्बधात बॅंकेचा परवाना रद्द केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र बॅकेची आर्थिक पत सुधारेपर्यंत बॅक आपले आर्थिक व्यवहार या निर्बंधाच्या अधिन राहून करू शकते, असे रिजर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. तसंच बॅंकेच्या आर्थिक स्थितीनुसार रिजर्व्ह बॅक पुढील कार्यवाही करणार असल्याचे रिजर्व बॅंकेने निर्देशात म्हटले आहे.

Similar News