आमच्या मागण्या पूर्ण - नरेंद्र पाटील

Update: 2018-01-29 09:59 GMT

धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचं निधन झाल्यानंतर सरकारला जाग आली आहे. रविवारी रात्री जे.जे. रुग्णालयात धर्मा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी सरकार जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण करत नाही तो पर्यंत आपल्या बाबांचे पार्थिव घरी घेऊन जाणार नाही असा पवित्रा घेतला होता. परंतु राज्य सरकारने धर्मा पाटील यांच्या मुलाला लेखी आश्वासन दिलं आहे. जमिनीचं फेरमूल्यांकन करुन पंचनाम्यानुसार जो मोबदला येईल तो व्याजासह 30 दिवसात देऊ, असं सरकारच्यावतीने म्हटलं आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचं पत्र धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र यांना दिलं आहे. नरेंद्र पाटील यांच्या मागण्यापूर्ण झाल्यामुळे ते धर्मा पाटील यांचे पार्थिव आपल्या मूळगावी धुळे येथे घेऊन जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांच्याशी फोनवरुन बातचीत केली असून मुख्यमंत्र्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Similar News