निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला 10 वर्षे मागे नेलं

Update: 2020-09-12 12:51 GMT

3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे तळ कोकणाचं प्रचंड नुकसान झालं आहे. या वादळाला आता तीन महिने पूर्ण होत आहेत. पण वादळानं झालेल्या नुकसानातून कोकण अजूनही सावरलेलं नाही. तीन महिन्यांनंतरही काही ठिकाणी नारळ आणि पोफळीच्या (सुपारीच्या) वाडीची साफ-सफाई पूर्ण झालेली नाही.

त्यात सरकारनं देऊ केलेली नुकसान भरपाई अपुरी असल्याचं बागायतदारांचं म्हणणं आहे. निसर्ग चक्रीवादळाने प्रामुख्याने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले. नारळ, सुपारी, आंबा आणि काजूच्या बागांची मोठी हानी झाली आहे. पुढील काही वर्षे शेतकऱ्यांना उत्पन्नच मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आंजर्ले येथील भालचंद्र कोकणे यांच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. मागच्या २ पिढ्यांनी कष्टाने उभ्या केलल्या बागा वनादळाने भुईसपाट केल्या आहेत. तीन महिनने उलटले तरी ३० ते ४० टक्के बागांचे पंचनामेच झालेले नाहीत. सरकारने दिलेली मदत पुरेशी नाही असं बागायतदारांचं म्हणणं आहे. सरकारच्या मदतीची वाट न पाहता आता बागायतदारांनी बागांचे काम सुरु केलंय.

नुकसान भरपाई आणि अनुदानाकडे न पाहता उध्वस्त झालेली बाग पुन्हा उभी करण्याच्या तयारीला ते लागले आहेत. जरी पुर्नलागवड करायची झाली तरी सरकारच्या जाचक अटींमुळे करू शकत नाही, त्यामुळे सरकारने जाचक अटी शिथिल कराव्या अशी मागणी बागायतदारांचं बागायतदारांनी केली आहे.

Full View

Similar News