MaxMaharashtra Impact: अंधारलेल्या गावात तब्बल तीस वर्षांनी लाईट आली....

Update: 2021-06-24 02:31 GMT

गेली तीस वर्षे अंधारात असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील बरड वस्तीवर अखेर मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीनंतर तीस वर्षांनी वीज आली आहे. यावेळी गावकऱ्यांनी घरासमोर रांगोळी काढत ,घरावर गुढ्या उभारून आनंद साजरा केला.




जगप्रसिद्ध अजिंठा लेणीपासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बरड वस्तीवर 200 पेक्षा जास्त लोकं राहतात. मात्र गेली तीस वर्षे झाली ही वस्ती अंधारात होती. त्यामुळे येथील गावकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. मुलांना रात्रीचा अभ्यास करण्यात अडचणी येत होत्या, तर अनेकांना सर्प चावल्याने आपला जीव गमवावे लागले. त्यामुळे या लोकांचं जीवन अंधारमय झालं होतं.




बरड वस्तीची व्यथा मॅक्स महाराष्ट्राने सर्वांसमोर आणली, त्यांचं दुःख प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि अवघ्या 10-15 दिवसात बरड वस्तीवर वीज आली. यावेळी गावकऱ्यांनी मॅक्स महाराष्ट्राचं आभार मानत आमचे प्रतिनिधीचं सत्कार ही केला.

Full View
Tags:    

Similar News