शेतकऱ्यांच्या आयुष्याचीच ‘होळी’

Update: 2019-03-21 12:17 GMT

‘’जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा वो भारत देश है मेरा’’ किंवा ज्या देशातून सोन्याचा धूर निघायचा त्याच भारतातून आताही धूर निघतोय पण तो धूर शेतकऱ्यांच्या जळणाऱ्या चितेचा आहे. तर ज्या फांद्यावर सोन्याच्या चिमण्या बसायच्या तिथं आता गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे फोटो दिसत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांची आकडेवारी पाहता शेतकऱ्यांच्या आय़ुष्याचीच ‘होळी’ होतेय, असं दुर्देवानं म्हणायची वेळ आलीय.

देशभर होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी मात्र मोसंबीच्या बागांची होळी करतोय. दुष्काळामुळं मोसंबीच्या बागा वाळून गेल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांकडं लक्ष देत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी ऐन होळीच्या दिवशीच मोसंबीच्या सुकलेल्या बागा पेटवून देऊन होळीला सुरुवात केलीय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील गावतांडा या गावात शेतकऱ्यांनी वाळलेल्या मोसंबीच्या बागाच पेटवून दिल्या..

यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या नावानं निषेध व्यक्त करत बोंबा मारल्या सुध्दा केली आहे... कुठलाही शेतकरी आपल्या पिकावर पोटच्या मुलाप्रमाणं प्रेम करतो. मात्र, तरीही तो आता बागाच्या बागाच जाळू लागल्या. ही भविष्यातल्या मोठ्या होळीची सुरूवात तर नाही ना, अशी भीती वाटायला लागलीय.

पैठणच्या गावतांडा शेख जाकीर यांनी आपल्या उभ्या मोसंबीचा बागेला आग लावली...

ही आग झाडाला लागलेली खरी असली तरी या आगीचा जन्मच मूळात सरकारी यंत्रणांच्या नाकर्तेपणातून झालाय, असं जाकीर यांना वाटतंय. जाकीर यांनी आठ एकर जमिनीवर मोसंबीची हजार झाडं ही काही वर्षांपूर्वी लावली होती. मात्र सततच्या दुष्काळामुळं मोसंबीची झाड हळूहळू वाळायला लागली. अशा परिस्थितीतही जाकीर यांनी कशीबशी पाचशे झाड जगवली. मात्र, ही पाचशे झाडंही आता जगवणं अवघड झालंय...कारण त्यांच्या भागात असलेल्या बंधाऱ्यांमध्ये सध्या पाणीच शिल्लक राहिला नाही. जायकवाडी धरण हे अवघ्या काही अंतरावर आहे...

जायकवाडी धरणातून पाणी मिळावं असं त्यांना वाटत होतं. मात्र, प्रशासन आश्वासनाच्या पलीकडे काही देत नसल्यानं आता जाकीर यांच्या प्रतिक्षेचा अंत झाला आणि जाकीर यांनी वाळलेली आपली बागच पेटवून दिली. तसेच होळीच्या या दिवसाला जाकीर यांनी आपल्या मोसंबीच्या बागेची होळी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

Full View

Similar News