दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Update: 2018-10-13 16:02 GMT

अखेर पेंच प्रकल्पाचे पाणी भंडारा जिल्ह्याच्या वरठी गावाच्या परिसरात पोहचला असले तरी मात्र आता पिकाला धान येणार नसल्याने या पाण्याचे काहीच फायदा नाही होणार नसल्याच्या आरोप शेतकरी करत आहेत. तर ज्या क्षेत्रात अजूनही पाणी पोहचला नाही तिथले पीकाचे तनसात रूपांतर होणार असल्याने योग्य सर्वे करून दुष्काळ घोषित करण्याची मागणी आता शेतकऱ्याने केली आहे.

https://youtu.be/gXSvF9Fk79U

मागील 2 महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने शेतकऱ्यांनी आपले पिक वाचविन्यासाठी उपोषण, आंदोलन, रास्ता रोको अश्या विविध पद्धतीने पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे या साठी प्रयन्त केले. शेवटी काल वरठी परिसरातील नहराला पाणी पोहचले,मात्र आता धान गर्भ धारणेची वेळ निघुन गेल्याने या पाण्याच्या उपयोग नसनार आहे. आता शेतात पाणी दिल्याने हिरवे पक्ष तर दिसेल मात्र त्या तुन उत्पादन मिळणार नाही असे शेतकरी सांगत आहेत.

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोया आहे त्यांची आपले पीक वाचविले. मात्र इतर शेतकऱ्यांचे शेतातील धान अक्षरशः वाळून गेले आहेत. मागील 4 वर्ष्यापासून या गावातील शेतकऱ्याना पाण्या अभावी नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

यातच शासनाने 2 वर्ष्यापुर्वी पेंच प्रकल्पाचे भंडारा जिल्ह्यात असलेले ऑफिस नागपूर ला हलविल्याने आता पाणी मिळविणे अधिकच कठीण झाले आहे।त्यामुळे आता दाँत आहे तर चने नाही अशी स्थिति शेतकऱ्यांची झाली आहे.

Similar News