प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ

Update: 2019-02-09 11:29 GMT

केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेतंर्गत शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये म्हणजे साधारणतः दिवसाला १७ ते १६ रुपये देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता ग्रामीण भागात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेकरिता कुटुंबातील खातेदारांपैकी एका खातेदाराचे स्वयंघोषणा पत्र दाखल करण्याचं सांगण्यात आलं आहे. आता ग्रामीण भागामध्ये भिंतीवर या योजनेतंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी लावण्यात आली असून या योजनेचा अर्ज शेतकरी भरू शकतो. म्हणून शेतकऱ्यांची एक गर्दी पाहायला मिळाली. विशेेष म्हणजे या याद्यांमध्ये साधारणतः ३ हेक्टर पेक्षा अधिक जमिनी असलेल्या शेतकऱ्यांची नावे आढळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. तर दुसरीकडे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे याची संपूर्ण माहिती सरकारकडे, तलाट्यांकडे असूनही शेतकऱ्यांकडून स्वयंघोषणा पत्रक का लिहून घेत आहे असा सवाल शेतकरी करु लागले आहे. तर काही शेतकऱ्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची घोषणा केली असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. यावरून कर्जमाफी झाल्यानंतर जशा शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला तसा होऊ नये यासाठी सरकारने योग्य उपाययोजना कराव्या जेणे करुन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

दरम्यान लातूर अहमदपूरमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच-लांब रांगा... पाहा हा व्हिडीओ

Full View

तर मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकऱ्यांनी सरकारच्या या जाचक अटीबद्््द््ल सांगितलं...

Full View

Similar News