८० हजाराच्या कर्जामुळे शेतकरी महिलेची आत्महत्या

Update: 2018-11-16 13:28 GMT

सततची नापिकी आणि दुष्काळामुळे चिखली तालुक्यातील थोत्रा भनगोजी येथे एका शेतकरी महिलेने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याची हदयद्रावक घटना घडलीय आहे. याच महिन्यात याच गावातीलच एका तरुण शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या पाठोपाठ गावातील ही दुसरी घटना आहे विशेष म्हणजे २००२ मध्येदेखील गावातील एका युद्ध शेतकऱ्याने अशाच प्रकारे स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली होती. त्याचीच पुनरावृत्ती घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

आशा दिलीपराव इंगळे यांनी १५ नोव्हेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास गायींच्या गोठयात लाकडे एकत्र करुन त्यावर पांघरण्याच्या कपड्यांचे बारीक तुकडे टाकून सरण रचले व त्यावर स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आशा दिलीपराव इंगळे यांच्या पतीचे (दिलीपराव इंगळे) २००८ साली हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर त्यांनीच मोठ्या हिमतीने कुटुंबाचा गाडा पुढे रेटला होता. मात्र त्यांच्याकडे असलेल्या अल्प शेतात सातत्याने अत्यल्प उत्पन्न येत असल्याने त्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती. त्यात त्यांच्यावर जिल्हा सहकारी बँकेचे ८० हजारांचे कर्ज तसेच काही खासगी देणे बाकी होते. काही देणे करऱ्यांचे पैसे चुकते केले, मात्र पुढे परिस्थिती आणखी बीकट होणार असल्याने त्या काही दिवसांपासून विवंचनेत होत्या. दरम्यान, दोन्ही मुले घरी नसल्याची वेळ साधून त्यांनी गायीच्या गोठयात कपडे, लाकडे आणि काडीकचऱ्या ने स्वतःचे सरण रचून स्वत:ला पेटवून घेतले. सदर गोठा कुडाचा असल्याने गोठयाने देखील लगेच पेट घेतला आणि यामध्ये आशा इंगळे पूर्णत: जळाल्या. ही बाब शेजाऱ्यांना समजताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र उशीर झाला होता मृतक शेतकरी आशा इंगळे ह्या याच गावाच्या माजी सरपंच होत्या.

Full View

Similar News