#दुष्काळ : ‘साहेब गावात पाणी असत तर आम्ही बाहेर कशाला गेलो असतो’

Update: 2018-11-15 13:19 GMT

सध्या राज्यातील पाणी स्थिती गंभीर आहे. काही ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्ले गाव जवळील शिरगाव म्हणून धारण आहे. आजूबाजूच्या परिसरातील गावांची आर्थिक नाडी याच धरणावर अवलंबून आहे. या धरणाला पाणी आल तरच आजूबाजूच्या परिसरातील शेत जमीन ओलिताखाली येते आणि कुठं तरी शेतकऱ्यांना फायदा होतो मात्र सध्या या ठिकाणी थेंबभर सुद्धा पाणी नाही. त्या मुळे शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर सुद्धा अगचणीत सापडले आहेत. यावर उपाय म्हणून शेतमजुरांना गावातील लोकां आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी इतर गावांना स्थलांतर करू लागले आहेत.

ही लोक दुसऱ्या गावांमध्ये जाऊन मजुरीकरतात त्याचे त्यांना जेमतेम ५० ते १०० रुपये मिळतात.

यावर एका शेतमजूर आजींना विचारले असता त्या म्हणाल्या की, "साहेब पोटासाठी बाहेर जावं लागत गावात जर पाणी असत तर बाहेर गावाला कशाला गेलो असतो पिण्याची पाण्याची पंचायत गावात पंचायत आहे. त्यामुळे आज धंदे नाहीत गावातल्या पुरुषांना सुद्धा बायकांसोबत बाहेर जावं लागत आणि त्यांना सुद्धा बायकांप्रमाणे रोज पडतो. आज गावात गॅस नाही पाणी नाही, कामं नाहीत रानं वाळून गेली ही अशीच स्थिती आहे. आणि जर हे नाही केलं तर खायाचं काय? मागच्या तीन वर्षांपासून पाणी नाही साहेब आम्ही करायचं काय?"

काय आहेत या शेतकऱ्यांच्या व्यथा पाहा हा व्हिडीओ...

Full View

Similar News