रिझर्व्ह बॅंकेचा दिलीप अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला २ लाखांचा दंड

Update: 2018-12-03 13:20 GMT

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिलीप अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बारशी या बॅकेला २,००,००० रुपयांचा दंड केला आहे. या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या पत्रात सोलापुर जिल्ह्यातील या बॅंकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बँकिंग रेग्युलेशन कायदा १९४९ (सहकारी संस्थांवर लागू असल्याप्रमाणे) कलम ४६ (४) या सोबत कलम ४७ ए(१) (बी) च्या तरतुदीत नमुद केल्याप्रमाणे, गुंतवणूक आणि नॉन-एसएलआर गुंतवणूकी वरील प्रुडेंशियल मर्यादांशी संबंध भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश / मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यानं हा दंड ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान, यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बॅकेला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. या नोटिसचं दिलीप अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेनं लिखित स्वरुपात उत्तर दिले होते. त्यावर रिझर्व्ह बॅंकेने दिलीप अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या उत्तरावर विचार करुन बॅकेला २ लाखांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

Similar News