“CM येत नाही तोपर्यंत मला जाळू नका”

Update: 2017-06-08 03:15 GMT

राज्यात शेतकरी संपाची धग तीव्र झाली आहे. अशात सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात एका शेतकऱ्यानं केलेली आत्महत्या सरकारचा करंटेपणा उघड करणारी ठरली आहे. करमाळा तालुक्यातल्या वीट गावात राहणाऱ्या धनाजी चंद्रकांत जाधव या ४५ वर्षीय शेतकऱ्यानं बुधवारी रात्री आत्महत्या केली. घराजवळच्या झाडाला त्यांनी गळफास घेतला. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात “ जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत तोपर्यंत मला जाळू नका” असं त्यांनी त्यांच्या मित्रांना उद्देशून लिहीलं आहे.

 

वीट गावातील जांभूळझरा वस्तीवर राहणाऱ्या धनाजी चंद्रकांत जाधव यांच्यावर सावकार व बँकेचे कर्ज होतं. धनाजी यांनी शेतकरी संपात सक्रिय सहभाग सुद्धा घेतला होता. पण, बुधवारी रात्री त्यांनी आठच्या सुमारास जवळ असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. धनाजी जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा बारावी व दुसरा दहावीला आहे.

Similar News